मुक्ताईनगरातील जे.ई.स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप


मुक्ताईनगर (23 जानेवारी 2025) : शहरातील जे.ई.स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.सी.एस.चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक पुरुषोत्तम महाजन, महेश पाटील यांची उपस्थिती होती.

प्राचार्य एन.पी.भोंबे यांच्याहस्ते अध्यक्षांचा व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला. डॉ.सी.एस.चौधरी यांनी विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन विविध क्षेत्रातील शैक्षणिक संधी विषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य एन.पी.भोंबे, एच.आर.झांबरे, व्ही.बी.राणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व्ही.एस राणे यांनी तर प्रास्ताविक डी.डी.जंगले तसेच आभार डी.बी.वारुडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


कॉपी करू नका.