रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना रेल्वेकडून 50 हजारांची मदत
भुसावळ (24 जानेवारी 2025) : परधाडेजवळ झालेल्या रेल्वे अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांच्या वारसांना रेल्वेकडून तातडीची मदत म्हणून 50 हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले तसेच उर्वरित एक लाखांची मदत नातेवाईकांच्या बँक खात्याद्वारे खात्री केल्यानंतर दिली जाणार आहे.
जखमींनाही दिली मदत
शिवाय जखमी प्रवाशांना एकूण दोन लाख 70 हजारांची मदत देण्यात आली. त्यात गंभीर दुखापतीसाठी प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात आले. त्यात हसन अली, विजय कुमार, उत्तम हरजन, धर्मा सावंत, अबू मोहम्मद यांना प्रत्येकी 50 हजार तर किरकोळ जखमांसाठी प्रत्येकी पाच हजारांची मदत मोहरम, . हकीम अन्सारी, दीपक थापा, हुजला सावंत यांना देण्यात आली.






