तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापराने वैज्ञानिक प्रगती शक्य : प्रा.डॉ.दयाघन राणे

भुसावळ (25 जानेवारी 2025) : विज्ञानातील प्रगती आणि जीवनोपयोगी विज्ञानातील उपकरणांना आपण नाकारू शकत नाही पण आपल्याला त्यांचा सांभाळून वापर करणे अपेक्षित असते. त्या माध्यमातून आपल्याला तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आपल्या वैज्ञानिक प्रगतीसाठी करता येतो. मोबाईल फोनच्या अतिरिक्त वापराने मानवी शरीरावर होणारे परिणाम होतात त्यामुळे आवश्यक तेव्हाच मोबाईलचा वापर करावा, असे आवाहन प्रा.डॉ.दयाघन राणे यांनी येथे केले. भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात सायन्स असोसिएशनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते.
तर जीवन निरामय : प्राचार्य
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी दैनंदिन जीवनात विज्ञानातील संकल्पना वापरल्यास जीवन निरामय होऊ शकते, असे सांगत केवळ विज्ञान शाखा नव्हे तर इतर शिक्षण शाखांमधील विद्यार्थ्यांनी सुध्दा विज्ञानातील संकल्पना समजून घेऊन आपले जीवन सुदृढ आणि संपन्न बनवावे, असे आवाहन त्यांनी केले. सायन्स असोसिएशनचे चेअरमन प्रा.संजय चौधरी यांनी प्रास्ताविक तर प्रा.धनश्री पाटील यांनी आभार मानले. प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.कबीर गवळी यांनी परिश्रम घेतले. प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.संजय बाविस्कर, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.कामिनी चौधरी, प्रा.उत्कर्षा पाटील, प्रा.आरती नवघरे, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.जागृती सरोदे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित असल्याचे प्रसिध्दी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.
