महिलेच्या गळ्यातून मंगलपोत ओढत भामटे दुचाकीने पसार
The robbers fled on a two-wheeler, pulling a rope from a woman’s neck जळगाव (28 जानेवारी 2025) : शतपावली करत रस्त्याने जाणार्या महिलेच्या गळ्यातील मंगलपोत ओढुन भामटा सुसाट दुचाकीने पसार झाला. ही घटना शनिवार, 25 रोजी रात्री 9.15 वाजेच्या सुमारास शहरातील जुना खेडी रोडवर घडली.
नंदा विकास कोळी (37, रा.दशरथनगर, काशीबाई शाळेमागे, जळगाव) या ठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. रात्री जेवण केल्यानंतर त्यांच्यासह अन्य एक सदस्य असे दोघे शतपावली करत होते. रस्त्याच्याकडेने चालत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवर एक संशयित तोंडाला पांढरा रुमाल बांधुन त्यांच्याजवळ आला. त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळपोत अचानक तोडुन सुसाट वेगाने पसार झाला. आरडाओरड दोघांनी केली,तोवर चोरटा परिसरातून निसटला होता.




9 ग्रॅम वजनाची मणी-मंगलपोत, चार ग्रॅम वजनाचे दोन वाट्या तसेच चार मोठे मणी तसेच पाच ग्रॅम वजनाचे लहाण मणी असा एकूण 63 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी तक्रारीनुसार शनिपेठ पोलीस ठाण्यात रविवार,26 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक योगेश ढिकले हे करीत आहेत.