ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे अँगल तुटल्याने अपघात : यावल तालुक्यातील मजूर जागीच ठार तर तिघे गंभीर


Accident Caused by Broken Tractor Trolley Angles: Laborer from Yawal Taluka Killed on the Spot; Three Others Critically Injured यावल (15 मार्च 2026) : यावल तालुक्यातील वढोदा या गावाजवळ अंकलेश्वर बर्‍हाणपूर राज्य मार्गावर ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीचे अँगल तुटल्यामुळे ट्रॉली रस्त्याच्या कडेला उलटल्याने या अपघातामध्ये 50 वर्षीय प्रौढ ठार झाला असून तीन जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी घडला. मयत व जखमी सर्व उत्तर प्रदेशातील बोरवेल कामगार आहेत. या अपघात प्रकरणी उशिरापर्यंत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

असा घडला अपघात
वढोदा, ता.यावल या गावाजवळून अंकलेश्वर बर्‍हाणपूर राज्य मार्ग मार्गस्त होतो या राज्य मार्गावरून शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशातील बोरवेल कामगार एका ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून यावलकडे येत होते. अचानक धावत्या ट्रक्टरच्या ट्रॉलीचे अँगल तुटले आणि अपघात घडला. यात ट्रॉली रस्त्याच्या कडेला कलंडली या अपघातामध्ये मुन्नू अबलाकसिंग चौहान (50, दरयागंज, ता.पटीयाली, जि.कासमगंज, उत्तरप्रदेश) हे वृध्द ठार झाले तर रामजी धुनी श्रीवास्तव (लोडय्या, ता.पटीयाली) व चालक केशव सुरेश चव्हाण (बिचोला, ता.पटीयाली, जि.कासमगंज, उत्तरप्रदेश) आदी जखमी झाले.

जखमींना तातळीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉ.तुषार सोनवणे, डॉ.रोहित कोळी, अधिपरिचारीका ज्योत्ना निंबाळकर, जॉन्सन सोरटे यांनी प्रथमोपचार केले. जखमींना अधिक उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रूग्णालयात हलवण्यात आले. अपघात प्रकरणी यावल पोलिसात संजू चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन चालक केशव सुरेश चव्हाण (बिचोला, ता.पटीयाली, जि.कासमगंज, उत्तरप्रदेश) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय विजय पाचपोळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !