शिवसेना शिंदे गटाची आज वरणगावात बैठक


वरणगाव (30 जानेवारी 2025) : भुसावळ तालुका शिवसेना (शिंदे गट) च्या सर्व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यांची बैठक गुरुवार, 30 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता बसस्थानकाजवळील शिवसेना संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

बैठकीत सदस्य नोंदणी अभियान, गाव तिथे शाखा आणि आयत्या वेळेवरचे विषय घेण्यात येणार आहे. भुसावळ विधानसभा तालुक्यातील सर्व शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी, युवासैनिक, महिला आघाडी पदाधिकारी, अल्पसंख्यांक आघाडी पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी या बैठकीला उपस्थितील द्यावी, असे आवाहन भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा प्रभारी तालुकाप्रमुख संतोष माळी यांनी केले आहे.


कॉपी करू नका.