तस्करी ऐरणीवर : पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून एक लाखांचा बेवारस गांजा जप्त


Smuggling on the rise : Unclaimed marijuana worth Rs 1 lakh seized from Puri-Ahmedabad Express भुसावळ (30 जानेवारी 2025)  : पुरीहून अहमदाबादकडे निघालेल्या एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाला बेवारस बॅगेत तब्बल एक लाख रुपये किंमतीचा 10 किलो गांजा आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री समोर आल्यानंतर पुन्हा गांजा तस्करी ऐरणीवर आली आहे. अज्ञात प्रवाशाविरोधात लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आता गांजा तस्कराला शोधण्यास सुरूवात केली आहे.

बेवारस बॅगेत आढळला गांजा
मंगळवार, 28 जानेवारी रोजी पुरी-अहमदाबाद 12843 या गाडीच्या पुढील जनरल डब्यात एक बेवारस बॅग आढळल्यानंतर एका प्रवाशाने भुसावळ स्थानक आल्यानंतर 8.35 वाजता आरपीएफकडे ही बॅग दिली. सीसीटिव्ही व पंचासमक्ष बॅगेची झडती घेतली असता पिवळ्याा रंगाच्या कपड्यात सफल पान मसाला लिहिलेले दोन बंडल आढळले. भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर.पी.मीना यांच्या उपस्थितीत आरपीएफने कपड्यातून बंडल बाहेर काढल्यानंतर त्यात गांजा आढळला.

यावेळी सहायक सुरक्षा स्टेशन अधिकारी शकील खान उपस्थित होते. 10 किलो 293 ग्रॅम वजनाच्या या गांजाची बाजारातील किंमत एक लाख दोन हजार 930 रूपये आहे. बुधवारी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


कॉपी करू नका.