शिरसाड गावात पेव्हर ब्लॉकच्या कामांचा शुभारंभ


यावल- शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागा मार्फत व ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा (2515) या योजनेंतर्गत चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार .प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून साकळी व शिरसाड येथे रस्त्यावर पेव्हरर ब्लॉक बसवण्याचे काम मंजूर करण्यात आलेले आहे. अंदाजीत दहा लक्ष रुपये किमतीचे साकळी गावातील श्रीराम मंदिर भागात पेव्हर ब्लॉक बसवून रस्ता तयार केला जाणार आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्या नीलिमा नेवे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह प्रभाग क्रमांक सहाचे ग्रामपंचायत सदस्य जगदीश मराठे, बेबाबाई चौधरी, मंगला बडगुजर, शिवसेनेचे शाखाप्रमुख संतोष महाजन, शिरसाडचे सरपंच गोटू सोनवणे, शिवसेनेचे गटप्रमुख महेंद्र चौधरी, ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक महाजन, सचिन चौधरी, जयंत बोरसे, शशिकांत नेवे, जीवन बडगुजर, धनराज माळी, पितांबर बडगुजर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. गावात रस्त्याचे काम होत असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.


कॉपी करू नका.