आदिशक्ती संत मुक्ताईच्या तीन दिवसीय पंचक्रोशी परिक्रमेला उत्साहात प्रारंभ

मुक्ताईनगर (31 जानेवारी 2025) : आदिशक्ती श्री संत मुक्ताईनगर पंचक्रोशी परिक्रमेस गुरुवारी सकाळी नऊ वाजता केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र मुक्ताई जुने मंदिर, कोथळी येथुन पालखी काढून प्रारंभ झाला. परिक्रमा प्रस्थानाप्रसंगी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, संत मुक्ताई संस्थान अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, रवींद्र महाराज हरणे, उद्धव महाराज जुनारे यांच्यासह बहुसंख्येने वारकरी बांधवांची उपस्थिती होती.
दरम्यान या परिक्रमेचा पहिला मुक्काम उचंदे तर 31 रोजी निमखेडी खुर्द येथे राहिला. शनिवार. 1 रोजी हरताळे येथे काल्याचे कीर्तनानंतर मुक्ताई जुने मंदिर कोथळी येथे महाप्रसादाने परिक्रमेची सांगता होणार आहे.


