दहा हजारांच्या बदल्यांत लाख रुपये देण्याचे आमिष : साक्रीसह गुजरातच्या संशयीताला बेड्या

Bailed for giving lakhs of rupees in exchange for ten thousand: Suspect from Gujarat along with Sakri arrested जामनेर (2 फेब्रुवारी 2025) : दहा हजारांच्या बदल्यात एक लाख रुपये देण्याचे आमिष दाखवणार्या साक्री व गुजरातच्या संशयीताला पहूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. फसवणुकीचा प्रकार जांभूळ, ता.जामनेर शिवारात शुक्रवारी दुपारी घडला. प्रकाश पीतांबर जाधव (51, रा.सामोडे, ता.साक्ती, जि.धुळे) व मोहम्मद समीर अब्दुल करीम (59, रा.बडोदा, गुजरात) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
असे आहे फसवणूक प्रकरण
जांभूळ, ता.जामनेर शिवारात जीवन खैरे (रा.चिंचखेडा) यांच्या फार्म हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी वरील दोन जण आले. त्यांनी खैरे यांना दहा हजारांच्या मोबदल्यात एक लाख करून देतो.. असे सांगितले. यावर खैरे यांनी या दोघांकडे 11 हजार रुपयांची रक्कम दिली. वरील दोघांनी हे पैसे पाण्याच्या बादलीत टाकले. सोबत केमिकलही टाकले. लाईट बंद करून खैरेची नजर चुकवून पैसे बादलीतून काढून घेतले. यादरम्यान महम्मद समीर याने खैरे यांना एका पांढर्या रुमालात नोटांचे बंडल दिले आणि दुसन्या दिवशी रुमाल उघडा म्हणजे एक लाख झालेले असतील, असे सांगितले. खैरेनी तातडीने रुमाल उघडला तर त्यात नोटांचे आकाराचे कागदाचे पांढरे बंडल निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खैरे यांनी पोलिसांना ही घटना कळवली.
साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस निरीक्षक सचिन सानप व उपनिरीक्षक भारत दाते हे काही वेळेत तिथे पोहचले. त्यांनी संबंधितांना ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी जीवन खैरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना जामनेर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयितांकडून चारचाकी वाहनासह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


