माझा कॉल का उचलला नाही म्हणत किनगावच्या 32 वर्षीय महिलेवर तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला


A 32-year-old woman from Kingaon was attacked with a sharp weapon by a young man, who said, “Why didn’t you pick up my call?” A case has been registered with the police. यावल (2 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील किनगाव येथील 32 वर्षीय महिलेल तरुणाने कॉल केल्यानंतर महिलेने कॉल न उचलल्याने तरुणाने जाब विचारत वाद घातला व संतापात महिलेला शिवीगाळ करून थेट तिच्या उजव्या पायाच्या मांडीवर चाकू सारख्या धारदार शस्त्राने वार करीत जबर दुखापत केली. ही घटना 30 जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
किनगाव गावातील मनीषा संदीप पाटील (32) या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ती घरी असतांना संशयीत मुकुंदा गणेश भंगाळे (32, डांभूर्णी) हा तरुण तिच्या घरात आला. मी तुला मोबाईलवर कॉल केला, तू माझा कॉल का उचलला नाही ?, तेव्हा महिलेने सांगितले की माझा मोबाईल सायलेंटवर होता आणि मी बाहेर गेली होती. तरीदेखील संशयीताने महिलेशी वाद घातला आणी महिलेला थेट शिवीगाळ केली व तिच्या उजव्या पायाच्या मांडीला धारदार शस्त्राने वार करून दुखापत केली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात मुकुंदा भंगाळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.


कॉपी करू नका.