नफ्याच्या आमिषातून जळगावातील व्यावसायिकाला सात लाखाचा गंडा

जळगाव (3 फेब्रुवारी 2025) : स्टॉक मार्केटशी संबधित अॅप्लीकेशन डाउनलोड करा आणि भरपूर नफा कमवा, असे आमिष दाखवित एका महिलेने व्यावसायीकाला सात लाख 30 हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला.
38 वर्षीय व्यावसायिक हे शहारात मार्केटींग करतात. 2 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी पावेतो त्यांच्या मोबाइल व्हाट्सअॅपवर एस.एम.आर्या आनंद असे नाव सांगणार्या महिलेने संपर्क साधला. तिने काही व्हॉट्पअॅप मॅसेज पाठविले. त्यानंतर व्हिडीओ कॉल करत संवाद साधला.
एका लिंकव्दारे स्टॉक मार्केटशी संबधीत अॅप्लीकेशन डाउनलोड करायला लावले. त्यावरुन वेळोवेळी व्यावसायीकाच्या बँक खात्यामधून एकूण सात लाख 30 हजार रुपये ऑनलाइन स्विकारले.
व्यावसायिकाला ना नफा दिला ना मुळ रक्कम दिली. महिलेने त्यानंतर व्यावसायिकाशी संपर्क बंद केला. त्यांचे फोन रिसीव्हदेखील केले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याची खात्री झाली. व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार 1 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक सतीष गोराडे हे तपास करीत आहेत.


