चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : पुणे-उस्मानाबादच्या दोघांकडून गावठी कट्टा जप्त
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2023/06/rawer-catta.gif)
जळगाव (3 फेब्रुवारी 2025) : गावठी कट्टा, जिवंत काडतूस दुचाकीने नेत असताना चोपडा ग्रामीण पोलिसांनी संशयीतांना 31 रोजी संध्याकाळी लासुर हातेड रस्त्यावरील पाटचारीजवळ पकडले. नौफील रब्बानी सैय्यद (वय 22,रा. हडपसर, पुणे) व अजय अशोक वाघमारे (24, रा.सलगर, जि.उस्मानाबाद) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
तरुण शस्त्र खरेदी करुन परतीच्या प्रवासाला दुचाकीने निघाल्यानंतर पथकाने लासूर-हातेड रस्त्यावर सापळा लावला असता संशयित दुचाकी पल्सर (एम.एच.12 आर.आर.6660) वर येताना दिसले. पथकाने दोघांना थांबवून चौकशी केल्यानंतर 25 हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा, तीन हजार रुपये किंमतीचे तीन जिवंत काडतुस, 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, 18 हजाराचा ओप्पो मोबाइल, 70 हजाराची दुचाकी, 500 रुपये रोख असा सुमारे एकूण एक लाख 36 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2025/02/mantri-niwad.jpg)
पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली.
या प्रकरणी कॉन्सटेबल राजेंद्र पाटील यांच्या तक्रारीनुसार संशयितांवर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक नितनवरे हे तपास करत आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार हे दोघे तरुण दुचाकीने कट्टा खरेदीसाठी आले होते. बेकायदेशीर शस्त्र खरेदी करुन ते उमर्टी व्हाया लासुरमार्गे ते परतीचा प्रवास करत होते. ही गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार केलेल्या कारवाईत दोघे शस्त्रासह मिळुन आले.