संजय राऊतांचा खळबळजनक दावा : ‘वर्षा’ बंगल्यातील लॉनमध्ये पुरली कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग


मुंबई (4 फेब्रुवारी 2025) : कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये पुरल्यात आल्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जात नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हणत खळबळ उडवून दिली आहे.

हा प्रतिष्ठेचा विषय
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही अंधश्रद्धा निर्मुलन कायदा मानणारे आहोत परंतु काही चर्चा सुरू आहेत. कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग काही लोकांनी आणलीत. ती शिंग वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये पुरलीत. मुख्यमंत्रिपद दुसर्‍या कुणाकडे टिकू नये असं काही आहे. तिथला कर्मचारी वर्ग तसं सांगतायेत. आम्ही मुद्दा लावून धरत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. हा प्रतिष्ठेचा विषय आहे. तिथे काय झालंय, काय घडलंय, मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकी भीती कशाची आहे. ते अस्थिर आणि अस्वस्थ का आहेत हे महाराष्ट्राला समजायला पाहिजे असं त्यांनी सांगितले.

लिंबूसम्राटांनी द्यावे उत्तर
देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाहीत हा आमचा प्रश्न आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन इतके महिने झाले तरी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे तिथे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का जात नाहीत, राहायला गेलो तरी मी झोपायला जाणार नाही असं फडणवीस म्हणतायेत असं ऐकण्यात आले. हा काय प्रकार आहे. अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे शिंदे गटात जे लिंबूसम्राट आहेत त्यांनी उत्तर द्यावे, असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंसह नेत्यांना लगावला आहे.


कॉपी करू नका.