यावल शहरात दुचाकी चोरताना संशयीत सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद

यावल (6 फेब्रुवारी 2025) : शहरातील आठवडे बाजारात असलेल्या पेट्रोल पंपाच्या आवारातून निमगावच्या शेतकर्याची मोटरसायकल लांबवण्यात आली. चोरीचा हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
काय घडले नेमके ?
यावल शहरातून अंकलेश्वर-बर्हानपूर राज्य मार्गावर आठवडे बाजारात पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपाच्या आवारात अशोक शिवनाथ पाटील (निमगाव) यांनी आपल्या मालकीची मोटरसायकल (क्रमांक एम.एच.19 बी. झेड. 1709) ही लावली होती. अज्ञात चोरट्याने त्यांचीही मोटरसायकल चोरी केली. चोरी करतानांचा हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. कितीतरी वेळ हा चोरटा मोटर सायकल वर बसून होता. नंतर हळूच त्याने अलगत ही मोटरसायकल तिथून लांबवली. त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चाव्या देखील असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आला. याबाबत यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.


