सावदा प्रीमियम लीगमध्ये रावेरचा के.जी.एन.संघ विजयी


सावदा (6 फेब्रुवारी 2025) : शहरातील आ.गं.हायस्कूलच्या मैदानावर एक दिवसीय सावदा प्रीमियम लीग स्पर्धा 1 जानेवारी रोजी झाली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सावदा येथील सावदा इलेव्हन व रावेर येथील के.जी.एन.या संघात लढत झाली. त्यात रावेर येथील के.जी.एन.संघाने 82 धावा केल्या तर सावदा संघ सावदा संघ 75 धावांवर ऑल आऊट होऊन पराभूत झाला.

रावेर येथील केजीएन संघ अंतिम विजेता ठरला व सावदा इलेव्हन उपविजेता राहिला. या स्पर्धेचे प्रथम बक्षीस 21 हजार हे सावदा येथील गजुभाऊ ठोसरे यांच्याकडून तर उपविजेत्या संघाला द्वितीय बक्षीस 11 हजार रुपये अदनान भाई यांनी दिले.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा 2 रोजी झाला. यावेळी समाजसेवक गजू ठोसरे, सावद्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, अदनान भाई आदी मान्यवरांच्या हस्ते विजेता व उपविजेता संघास बक्षीस वितरण करण्यात आले.


कॉपी करू नका.