रावेर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विनोद तायडे


रावेर (6 फेब्रुवारी 2025) : रावेर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विनोद तायडे यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी गिरीश पाटील यांची निवड झाली. चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे दोन्ही जागा रिक्त होत्या. या पदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक होऊन चेअरमनपदी विनोद तायडे व व्हाईस चेअरमनपदी गिरीश पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

संस्थेचे संचालक तुषार मानकर, रावेर शिक्षण संवर्धक संघाचे संचालक व रावेर विकास सोसायटीचे संचालक विजय लोहार, सामाजिक कार्यकर्ते अशोक वाणी, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, दिलीप पाटील सुरेश शिंदे, महेश अत्रे, निलेश पाटील, भागवत सातव, रामदास महाजन यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा या निवडीबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.


कॉपी करू नका.