कंडारीत पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण : भावंडांविरोधात गुन्हा

भुसावळ (8 फेब्रुवारी 2025) : भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे उसनवारीने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भावंडांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे हाणामारी प्रकरण
अजय हिरामण सोनवणे (24, महादेव टेकडी, कंडारी, ता.भुसावळ) या तरुणाच्या तक्रारीनुसार, त्यांच्या मोठ्या काकाच्या मुलावर पैसे बाकी असल्याच्या वादातून संशयीतांनी हनुमान मंदिराजवळ 5 रोजी रात्री दहा वाजता येत शिविगाळ करून मारहाण केली तर मयूरने वीट तोंडावर मारून दुखापत केली. याप्रकरणी चंद्रकांत दत्तू सोनवणे व मयूर दत्तू सोनवणे (21, दोन्ही रा.महादेव टेकडी, कंडारी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाकीर मन्सुरी करीत आहेत.


