धुळे प्रांत कार्यालयातील लाचखोर महसूल सहाय्यकाची पोलीस कोठडीत रवानगी


Bribery revenue assistant at Dhule provincial office remanded in police custody धुळे (11 मार्च 2025) : गौण खनिजाच्या ट्रॅक्टरवरील दंड आकारणी कमी करून देण्याच्या मोबदल्यात 13 हजारांची लाच मागून ती कार्यालयातच स्वीकारणार्‍या धुळ्यातील महसूल सहाय्यकाला धुळे एसीबीने सोमवारी सायांकळी पकडले होते. संशयीत दिनेश सूर्यभान वाघ (39, रा.प्लॉट.नं.19-अ, बिजली नगर, नकाणे रोड, धुळे) यास धुळे एसीबीने मंगळवारी न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

संशयीताला एका दिवसांची कोठडी
26 वर्षीय तक्रारदार यांच्या चुलत भावाचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरारी पथकाने मौजे कोकले, ता.साक्री शिवारात 5 मार्च रोजी पकडून तहसील कार्यालय, साक्री येथे जमा केले होते. ट्रॅक्टरवर आकारणी केलेल्या दंडाची रक्कम उपविभागीय अधिकारी, धुळे यांच्याकडून कमी करून देण्यासाठी 15 हजारांची लाच आरोपी वाघ याने 7 व 10 मार्च रोजी मागितल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली व कार्यालयातच लाच स्वीकारताच वाघ यास सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली. संशयीताला मंगळवारी धुळे न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास धुळे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


कॉपी करू नका.