भुसावळात कौटूंबिक वादातून पत्नीवर ब्लेडने हल्ला

Wife attacked with blade over family dispute in Bhusawal भुसावळ (8 फेब्रुवारी 2025) : दाम्पत्यात झालेल्या कौटूंबिक वादानंतर संतप्त पतीने पत्नीला मारहाण करीत गळ्यावर व डाव्या हातावर ड मारून विवाहिता जखमी झाली. ही घटना 3 रोजी रात्री साडेआठ वाजता पंचशील नगरात घडली.
शबनम बी वसीम शहा (21, पंचशील नगर, भुसावळ) या विवाहितेच्या तक्रारीनुसार, आरोपी पती वसीम शहा बरकत शहा (पंचशील नगर, भुसावळ) याने कौटूंंबिक वादानंतर शिविगाळ करीत मारहाण केली तसेच हातावर व गळ्यावर ब्लेडने वार केले. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.


