समाजकंटकाने जळगावात रिक्षा पेटवली

जळगाव (8 फेब्रुवारी 2025) : पेटवून दिल्याने ऑटो रिक्षाचा कोळसा झाला. समाजकंटकाच्या या कृत्यात गॅस सिलेंडर थोडक्यात बचावले त्यामुळे अनर्थ टळला. गुरुवार, 6 रोजी मध्यरात्रीनंतर ही घटना शहरातील छत्रपती शिवाजीनगर येथील लाकुडपेठ येथे घडली. या आगीत रिक्षाचे सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले.
अडीच लाखांचे नुकसान
अजय राजेंद्र जगताप (34, रा.लाकुडपेठ, शिवाजीनगर) हे येथे पत्नी हर्षाली, सासु सपना भोसले, तसेच दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. राजु गणपत चौरे यांच्या मालकीची (एमएच 19 सीडब्ल्यू 6348) ही प्रवासी वाहतूक रिक्षा आहे. रात्रीच्या शिप्टमध्ये ही रिक्षा अजय जगताप नियमित चालवितात. त्यामुळे नेहमी रिक्षा रात्री ते त्यांच्या घरासमोर लावत होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे रात्री त्यांनी ही रिक्षा घरासमोर लावली.आणि ते घरात कुटुंबासह झोपले. दरम्यान रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास रिक्षाला कोणी तरी पेटवून दिली, अशी लोकांमध्ये आरडाओरड सुरू झाली. हा आवाज ऐकल्यानंतर अजय जगताप घराबाहेर आले असता रिक्षाला लागलेली आग नागरिक पाणी मारुन विझवित असल्याचे त्यांना दिसले.
या आगीत रिक्षाचे टफ, शिटा, संपुर्ण फायबर, वायरिंग, पुढील व मागील संपुर्ण भाग जळालेली रिक्षाचे अंदाजे 2 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले.


