मुलींना अश्लील शिविगाळ : हिंगोणा शाळेला संतप्त पालकांनी ठोकले कुलूप


Girls abused obscenely : Angry parents lock Hingona school यावल (9 फेब्रुवारी 2025) : जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील मुख्याध्यापिका अश्लील शिविगाळ करीत असल्याच्या निषेधार्थ संतप्त पालकांनी थेट शाळेला कुलूप ठोकले. ही संतापजनक घटना यावल तालुक्यातील हिंगोणा येथे घडली. गटशिक्षण अधिकार्‍यांनी तात्पुरत्या स्वरूपात मुख्याध्यापिकेची बदली करीत या प्रकरणी चौकशीचे आश्वासन दिल्याने पालक माघारी परतले.

संतप्त पालकांनी ठोकले कुलूप
हिंगोणा जि.प.मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनी शनिवारी शाळा सोडून घरी आल्यानंतर त्यांनी मुख्याध्यापिका शिविगाळ करतात, अशी माहिती पालकांना दिली. यानंतर पालकांनी शाळा गाठली. तेवढ्यावरच न थांबता शाळेच्या गेटला कुलूप लावले. काहींनी आमदार अमोल जावळे यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे जावळे यांनी गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांना चौकशीच्या सूचना केल्या. धनके हे तातडीने हिंगोणा गावात दाखल झाले. त्यांनी शालेय व्यवस्थापन समितीसह विद्यार्थिनींशी चर्चा केली. यानंतर तात्पुरत्या स्वरूपात मुख्यध्यापिकेची बदली केली. या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले.

मुख्याध्यापिकेची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाहीच, अशी भूमिका शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी घेतली त्यामुळे शिक्षण विभागाने मुख्याध्यापक पदाचा पदभार तात्पुरता स्वरूपात सपना सपकाळे यांच्याकडे सोपवला.

 


कॉपी करू नका.