वाळू माफियांविरोधात मोठे पाऊल : मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह नऊ जण हद्दपार

Nine people including Manoj Jarange’s brother-in-law deported जालना (9 फेब्रुवारी 2025) : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरसह नऊ संशयीतांना जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
हद्दपार संशयीतांविरोधात वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. गोदी पोखरणार्यांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.
काही आरोपींविरोधात 2019 पासून गुन्हे दाखल आहेत. आणखी काही प्रस्ताव प्रशासनाने तयार केले आहे. या नऊ आरोपींपैकी सहा आरोपींचा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रीय सहभाग आहे.
मिळालेली माहिती अशी, ही कारवाई अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने केली आहे. या आरोपींविरोधात जालन्यातील अंबड, घनसावंगी, गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे 2019 पासूनचे आहेत. रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली आहे, यात प्रशासनावरती हल्ला केल्याचे आरोपही आहेत.
हे संशयीत हद्दपार
वामन मसूरराव तौर, रामदास मसूरराव तौर (दोघेही रा. शिवनगाव ता.घनसावंगी), संदीप सुखदेव लोहकरे (रा.अंबड, ता.अंबड), विलास हरीभाऊ खेडकर (33, रा.गंधारी, ता.अंबड), गोरख बबनराव कूरणकर (कुरण, ता.अंबड), अमोल केशव पंडीत, केशव माधव वायभट (अंकूशनगर, ता.अंबड), गजानन गणपत सोळंके, सुयोग मधूकर सोळंके (दोघेही रा.गोंदी ता.अंबड) या संशयीतांना हद्दपार करण्यात आले.


