राज्यातील चार आयएएस अधिकार्यांच्या बदल्या : अमरावती पालिकेच्या आयुक्तपदी सौम्या शर्मा
जिथिन रहमान यांच्याकडे बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी

Four IAS officers transferred in the state: Soumya Sharma appointed as Commissioner of Amravati Municipality मुंबई (17 जून 2025) : राज्यातील चार आयएएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात आठ आयएएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर पुन्हा अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
अशा झाल्या बदल्या

मुंबईतील मुख्य कार्यकारी अधिकारी ( मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी) यांची जिल्हा परिषद, वर्धा म्हणून नियुक्ती करण्यात आली.
अमरावती महापालिका आयुक्त सचिन कळंत्रे यांची यशदा, पुणे येथील उपमहासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा-चांडक यांची अमरावती महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
वर्धा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जिथिन रहमान यांची बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.
