भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात नृत्यस्वरांजली कार्यक्रमातून कलागुणांचे सादरीकरण

Presentation of talents through the Nrityaswaranjali program at Nahata College, Bhusawal भुसावळ (9 फेब्रुवारी 2025) : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील कला मंडळ अंतर्गत नृत्यस्वरांजली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मोहनभाऊ फालक यांनी केले. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन महेश फालक, संस्थेचे सचिव विष्णू चौधरी, संस्थेचे कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य प्रा.डी.एन.पाटील, कला मंडळाचे चेअरमन प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी कला गुण आत्मसात करावेत
विद्यार्थी जीवनात अभ्यासा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी इतर कलागुण आत्मसात केले पाहिजे. त्यांच्या या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून नृत्य स्वरांजलीमार्फत कलागुणांचे सादरीकरण केले जात असल्याचे मोहन फालक म्हणाले. प्रास्ताविक कलामंडळ चेअरमन डॉ.आर.एस.नाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.सी.एच.सरोदे यांनी केले. विद्यार्थ्यांनी गीत गायन, समूहगीत, देशभक्तीपर गीत, मल्याळम गीत, मराठी गीत, लावणी यासह विविध नृत्यप्रकार सादर करून विद्यार्थ्यानी प्रेक्षकांची दाद मिळवली. युथ फेस्टिवलमध्ये सादर झालेले डांगी नृत्य झाले. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांचाहस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा.डॉ.स्वाती फालक व प्रा.अक्षरा साबळे यांनी काम पाहिले. यावेळी प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षिकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. आभार प्रा.पूनम महाजन यांनी मानले.