वरणगावात वासुदेव परिवारातर्फे संगीतमय हनुमान चालीसा पठण
36 भाविकांनी 396 वेळा केला पाठ : धर्माच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न

भुसावळ (9 फेब्रुवारी 2025) : सनातन हिंदू धर्माच्या बळकटीसाठी आणि जनमाणसाच्या मनामनात हनुमान चालीसा रुजवण्यासाठी वरणगाव येथील वासुदेव परिवारतर्फे शनिवारी 396 वेळा संगीतमय सामुहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ॐ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानतर्फे रेवा कुटी, वरणगाव याठिकाणी शनिवारी 396 वेळा संगीतमय सामुहिक हनुमान चालीसा पठण उपक्रम राबविण्यात आला. सर्वात आधी पंचमुखी हनुमान पूजन, सामूहिक रामस्तुती यानंतर सर्वांनी मिळून 11 वेळा हनुमान चालिसाचे पाठ करण्यात आले. नंतर आरती आणि प्रसाद वाटप करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी सर्वांना टिळा लावण्यासाठी शिक्के दीपक फेगडे यांच्याकडून वाटण्यात आले. तबला वादक कुणाल शिंदे यांनी उत्तम साथ दिली. यावेळी तुकाराम पाटील, वैशाली पाटील, डॉ.निलेश बेंडाळे, डॉ.विशाखा बेंडाळे, डॉ.रवींद्र माळी, उषा राणे, रुपाली महाजन आदींसह नागरिक उपस्थित होते. उपक्रम यशस्वीतेसाठी संजय महाजन, कल्पेश वराडे, कृष्णा चौधरी, डॉ.नितु पाटील, वेदांत पाटील, दुर्वांग पाटील, दीपक फेगडे यांनी परिश्रम घेतले.
दर महिन्याच्या दुसरा शनिवार पठण
वासुदेव परिवारातर्फे शनिवारी जया एकादशीच्या शुभ मुहूर्तावर संगीतमय सामुहिक हनुमान चालिसा पठण करण्यात आले. आता हा उपक्रम दर महिन्याच्या दुसरा शनिवारी आयोजित करण्यात येणार आहे. वरणगावसह परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे वासुदेव परिवाराचे सदस्य डॉ.अनिल शिंदे यांनी केले आहे.


