मुंबईतील आयकर विभागातील महिला अधिकार्‍याच्या खात्यातून 26 लाख परस्पर काढले : जळगावातील प्रकार


जळगाव (10 फेब्रुवारी2025)  मुंबई आयकर विभागात अधिकारी असलेल्या महिलेच्या खात्यातून अज्ञाताने 26 लाख रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
कुलर कंपनीत भागीदारी असताना कंपनी मालकाच्या मृत्यूनंतर वारस लागलेल्या मुंबईतील आयकर विभागात कार्यरत अधिकारी असलेल्या संयोजिता मुदित नागपाल यांचे नाव लागले. त्यांनी वडिलांच्या बँक खात्यातील काही रक्कम काही महिन्यांपूर्वी काढल्यानंतर या खात्यातून 26 लाखांची रक्कम गौरव सुनील तिवारी नावाच्या खात्यावर वळती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संयोजिता यांच्या वतीने सुशील कुमार अशोफा (69, रा.केवल अपार्टमेंट, गणपतीनगर, जळगाव) यांनी शनिवारी रामानंद पोलिसात तक्रार नोंदवली.


कॉपी करू नका.