वरणगाव शहरात भूमिगत गटार प्रकल्पाला मंजुरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांना ‘साकडे’

माजी नगराध्यक्ष सुनील काळेंनी दिले निवेदन : खोटे गुन्हे रद्द करण्याचीही मागणी


भुसावळ (18 फेब्रुवारी 2025) : नोव्हेंबर 2024 मध्ये वरणगाव शहरात 82 कोटींच्या भूमिगत गटार प्रकल्पाला तांत्रिक मान्यता मिळाली असून या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी देऊन वरणगाव भूमिगत गटार प्रकल्प मंजूर करण्यात यावा, अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे जामनेर भेटीप्रसंगी वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरणगाव शहरात भूमिगत गटार प्रकल्प मंजुरीसाठी सकारात्मकता दर्शवली.

खोटे गुन्हे मागे घ्यावेत
दीपनगर प्रकल्पात सुशिक्षित बेरोजगारांसाठी शांततेत तिरंगा आंदोलन करण्यात आले मात्र दीपनगर वीज निर्मिती केंद्राने वरणगावातील सुशिक्षित बेरोजगारांवर खोटे गुन्हे दाखल केले ते खोटे गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे व चौकशी करून खोटे गुन्हे दाखल करणार्‍यांची चौकशी करावी, वरणगाव शहरासाठी 19 सप्टेंबर 2019 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री असताना 25 कोटींची 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली मात्र नगरपरिषद प्रशासनाच्या हालगर्जीपणाच्या धोरणामुळे व दिरंगाईमुळे योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही त्यामुळे वरणगावकरांना 15 दिवसाआड पाणी मिळत असल्यामुळे वरणगावकरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत.


योजनेचे काम जलद गतीने करण्याबाबत आदेश देऊन उर्वरित नवीन जॅकवेल व पिण्याच्या पाण्याच्या टाक्या मंजूर कराव्यात तसेच विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे पाटबंधारे व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भेट घेऊन निवेदन देऊन केली. तीन्ही मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, हितेश चौधरी, शंकर अण्णा पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी तीन्ही मागण्यांसंदर्भात सकारात्मकता दर्शवल्यामुळे वरणगावकरांना न्याय मिळणार असल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले. निवेदनाच्या प्रती मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनाही देण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !