रेल्वेत नोकरीच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा
जळगाव (18 फेब्रुवारी 2025) : रेल्वेत शेतकर्याच्या मुलाला नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तब्बल साडेपाच लाखांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. याप्रकरणी जळगाव न्यायालयाच्या आदेशानुसार रविवारी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
प्रभाकर सोपान जावळे (55, रा.ममुराबाद, ता.जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा कुणाल प्रभाकर जावळे याला रेल्वेत नोकरीला लावून देतो असे सांगून सतीश दिलीप चौधरी (32), शशिकांत दिलीप चौधरी (29), धर्मराज भैय्या रमेश खैरनार (35), सरिता पंढरीनाथ कोळी (45, सर्व रा, चहार्डी, ता.चोपडात्र, पंढरीनाथ भागवत कोळी (50, रा.चहार्डी, ता.चोपडा) यांनी वेळोवेळी शेतकरी प्रभाकर जावळे यांच्याकडून रोख स्वरूपात आणि ऑनलाईन पध्दतीने एकूण साडे पाच लाख रूपये घेतले. त्यानंतर मुलाला नोकरी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी दिलेले पैसे मागितले असता पैसे देण्यास देखील नकार दिला. त्यामुळे पीडीत शेतकरी प्रभाकर जावळे यांनी जळगाव न्यायालयात तक्रार दाखल केली.




यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
जळगाव न्यायालयाने तक्रारीची दखल घेत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रभाकर सोपान जावळे यांच्या फिर्यादीवरून सतीश दिलीप चौधरी (32), शशिकांत दिलीप चौधरी (29), धर्मराज भैय्या रमेश खैरनार (35), सरिता पंढरीनाथ कोळी (45, सर्व रा, चहार्डी, ता.चोपडा), पंढरीनाथ भागवत कोळी (50, रा.चहार्डी, ता.चोपडा) यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील करीत आहे.