पाचोर शहर खुनाने हादरले : खुन्नसने पाहिल्याने तरुणाची चाकू मारून हत्या


पाचोरा (19 फेब्रुवारी 2025) : शहरात जुन्या वादातून तरुणाची चाकू मारून हत्या करण्यात आली. ही घटना शहरातील बाहेरपुरा भागात बुधवारी मध्यरात्री 12.30 वाजता घडली. हेमंत संजय सोनवणे (20, जुना माहेजी नाका, महात्मा फुले नगर, पाचोरा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे तर संशयीत रोहित गजानन लोणारी (20, शिव कॉलनी) यास अटक करण्यात आली.

काय घडले नेमके
मंगळवार, 18 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन शिवजयंती निमित्त मिरवणूक निघाली व मिरवणुकीनंतर हेमंत संजय सोनवणे (20) यास शहरातील बाहेरपुरा येथे रोहित गजानन लोणारी याने खुन्नसने का पाहतो म्हणून वाद घालत पोटात चाकू मारला व संशयीत पसार झाला.



घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक पवार व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी हेमंत सोनवणे यास तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हेमंत सोनवणे हा गंभीर जखमी असल्याने त्यास सुरूवातील शहरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले व प्रथमोपचार करून लागलीच जळगाव सिव्हीलला उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोहित लोणारी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये कमलाकर श्रावण महाजन (48, पाचोरा) यांच्या फिर्यादीवरून रोहित लोणारीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !