भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयाच्या सुजल शुक्ला व डिगंबर कोळीची क्रीडा महोत्सवासाठी निवड


भुसावळ (19 फेब्रुवारी 2025) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व जळगाव विभाग क्रीडा समिती अंतर्गत आंतर विभागीय मैदानी स्पर्धा एम.जे.कॉलेजमध्ये 9 ते 10 डिसेंबर रोजी झाल्या. यात दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील खेळाडू सुजल महेंद्र शुक्ला (एस.वाय.बी.सी.ए.) ने गोळा फेक, थाळी फेक प्रकारच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला तसेच डिगंबर कोळी (एस.वाय.बी.ए.) याने गोळा फेक प्रकारच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.

या खेळाडूंची गडचिरोली विद्यापीठात होणार्‍या 26 व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या अ‍ॅथलेटिक्स संघात पात्र होऊन निवड झाली. ही स्पर्धा 18 ते 22 फेब्रुवारी 2025 दरम्यान होत आहे. सराव शिबिर विद्यापीठ क्रीडा संकुलात 14 ते 16 फेब्रुवारीदरम्यान झाले.


यश संपादन केल्याबद्दल महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा.डॉ.संजय चौधरी उपस्थित होते. या यशाबद्दल विद्यापीठ क्रीडा संचालक प्रा.डॉ.दिनेश पाटील, निवड समिती सदस्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी, प्रा.डॉ.शैलेश पाटील, प्रा.विनीश चंद्रन, महाविद्यालयातील क्रीडा समिती सदस्य प्रा.डॉ.ए.आर.सावळे, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रकाश सावळे, सुनील ठोसर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !