परीक्रमावासी डॉ.नितु पाटील यांचा जाहीर सत्कार


भुसावळ (20 फेब्रुवारी 2025) : श्री म्हाळसादेवी मंदिर संस्थान तळवेलच्या 14 व्या वर्धापन दिन सोहळा निमित्त आयोजित श्री संगीतमय रामायण कथा व अखंड हरीनाम सकीर्तन सोहळा कार्यक्रमात तळवेल गावातील पहिले माता नर्मदा परीक्रमावासी डॉ.नितु पाटील यांचा सपत्नीक सत्कार संस्थानमार्फत करण्यात आला. व्यासपीठावर ह.भ.प.मनोज बुवा सोबत त्यांचे सर्व भजनी मंडळ तसेच भुसावळ शेतकी अध्यक्ष ज्ञानदेव झोपे, अर्जुन इंगळे, संस्थान अध्यक्ष प्रा.डॉ.निलेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील, सुधीर पाटील, विनोद पाटील, ओंकार भोगे, ललिता पाटील, रवी पाटील आदी उपस्थित होते.यावेळी डॉ.नितु पाटील यांचे वडील तुकाराम पाटील आणि आई वैशाली पाटील यांचादेखील सत्कार करण्यात आला.

सत्कार सोहळा आयुष्यभर स्मरणात
आपल्या गावातील नागरिकांनी केलेला हा सत्कार नक्कीच महाकुंभात त्रिवेणी संगमावर स्नान केल्या समान आहे, किंबहुना कणभर जास्त आहे कारण सत्कार माझ्या तळवेलवासीयांना केला असल्याने हा सोहळा आयुष्यभर लक्षात राहणारा असल्याचे नर्मदा माता परीक्रमावासी डॉ.नितु पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. यावेळी तुकाराम पाटील, वैशाली पाटील, डॉ.रेणुका पाटील, वेदांत, दुर्वांग, कपिल राणे, दीपक फेगडे, गोलू, मझर शेख, योगेश मगरे आदी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !