रावेर शहरात अवतरली ‘शिवशाही’
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
रावेर (20 फेब्रुवारी 2025) : शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान भगव्या पताकांनी शहर उजळून निघाले तर शिवभक्तांनी जयघोष करत वातावरण दणाणून सोडले. मिरवणुकीवर फुलांची उधळण करत शिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करण्यात आले.
प्रमुख मार्गावरून निघाली मिरवणूक
शहरातील जिजाऊ नगरात ाजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी दीपक सुरवडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीकात्मक वेशभूषा साकारली तर पवन महाजन, जितेंद्र वानखेडे, निलेश महाजन आणि कन्हिया भारते यांनी मावळ्यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. मिरवणुकीत स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि युवक भगव्या टोप्या परिधान करून सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही भव्य मिरवणूक छत्रपती शिवाजी चौक येथे समाप्त झाली.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.संदीप पाटील, पोदार स्कूलचे चेअरमन डॉ.गुलाबराव पाटील, स्वामी शाळेचे प्रमुख रवींद्र पवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, सी.एस.पाटील किशोर पाटील, महेमुद शेख, भाजपा उद्योग आघाडीचे अरुण शिंदे, डॉ.सुधाकर पाटील, दिलीप पाटील, वामनराव पाटील, संतोष पाटील, जिल्हा शिवसेना उपप्रमुख प्रल्हाद महाजन, बाजार समिती संचालक मंदार पाटील अशोक शिंदे, माजी सभापती नीळकंठ चौधरी, घनश्याम पाटील, प्रशांत पाटील, दिलीप कांबळे, अजाबराव पाटीत, शहराध्यक्ष शिवसेना राकेश घोरफडे, राजू सवर्णे, गयास शेख, युसूफ खान, शाम शिंदे, जितेंद्र महाजन, महेश शिंदे, लखन महाजन, सावन मेढे, बाळा आमोदकर, शरद राजपूत, राजेश शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पोलिसांनी राखला बंदोबस्त
मिरवणुकीदरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग, रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त केला. नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला भव्य स्वरूप दिले.
