भुसावळात शिवजयंती उत्सव अध्यक्षपदी निर्मल कोठारी

तिथीनुसार शिवजयंती विविध उपक्रमातून उत्साहात साजरी करण्याचा निर्धार


भुसावळ (23 फेब्रुवारी 2025) : शहरातील बालाजी मंदिरात शनिवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार साजरी करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी यांची निवड करण्यात आली. यावेळी जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्याचा निर्धार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
शहरातील बालाजी मंदिरात शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बैठकीचे आयोजन केले होते. मावळते अध्यक्ष युवराज लोणारी यांच्या अध्यक्षतेखाली 2025 च्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (तिथीनुसार) बैठक झाली. या बैठकीमध्ये नवीन अध्यक्ष म्हणून निर्मल कोठारी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी माजी उपाध्यक्ष मिलिंद कापडे, मुकेश गुंजाळ, ललितकुमार मुथा, किरण कोलते, दीपक धांडे आदी शिवप्रेमी उपस्थित होते. उमाकांत शर्मा यांनी बैठकीचे नियोजन केले. तिथी नुसार शिवजयंती सोमवार, 17 मार्च रोजी होणार असल्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन जयंतीच्या दिवशी करण्यावर बैठकीत चर्चा झाली. सर्वांनी एकत्र येत शिवजयंती कार्यक्रम उत्साहात साजरा कर ावा, असे आवाहन नूतन अध्यक्ष निर्मल कोठारी यांनी केले. बैठकीनंतर सर्व पदाधिकारी यांनी रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जाऊन अभिवादन केले.


यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीला मिलिंद कापडे, मुकेश गुंजाळ, ललितकुमार मुथा, किरण कोलते, चेतन जैन, दीपक धांडे, किरण मिस्त्री, वरुण इंगले, जयेश चौधरी, उमाकांत शर्मा (नमा), निलेश चौधरी, अमित खरारे, गौरव आवटे, हर्षल पाटील, राहुल तायडे, सोनू चिप्पड, राजू पाटील, राहुल महाजन, भागवत तायडे, भूषण महाजन, विजय राठोड, पंकज हिंगणे, नंदकिशोर राहुल महाले, गणेश पाटील, सौरभ पवार, रोहीत सुतार, कुणाल परदेशी, व इतर शिवप्रेमी व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !