केळी उत्पादक शेतकर्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा : मंत्री रक्षा खडसे
सावदा (24 फेब्रुवारी 2025) : पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार 2022-23 या हंगामातील गारपीट ह्या हवामान घटकाअंतर्गत केळी पिकाला गारपीटचा फटका बसून शेतकर्यांचे नुकसान झाले होते. अशा एक हजार 331 शेतकर्यांना एकूण दोन कोटी 33 लाख 54 हजार 143 रुपये भरपाई मंजुूर झाली असून अनेक शेतकर्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली असून काहींच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होईल, असे मंत्री रक्षा खडसे यांनी कळवले आहे.
2022-2023 या हंगामात गारपीटीमुळे शेतकर्यांचे नुकसान होऊन दोन वर्ष उलटून सुद्धा शेतकर्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली नसल्याने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी वेळोवेळी केंद्र तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता.

