पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना भुसावळातून मदतीचा हात


भुसावळ : माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाच्या वतीने भुसावळ येथून पुरग्रस्तांसाठी सलाईन्स व सर्दी ताप, शुगर, बी.पी.साठी लागणार्‍या औषध गोळ्यांचे वाटप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंभोरे यांनी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. बुलढाणा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा मीनल संतोष आंबेकर व विजय अंभोरे यांनी स्व.राजीव गांधी यांचा राजकीय व सामाजिक जीवन प्रवास कार्यकर्त्यांसमोर मांडला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी युवा नेते योगेंद्र पाटील, युथ काँग्रेसचे दीपक रेढे, प्रा.डॉ.संतोष आंबेकर, मुन्वर खान, हितेश पाटील, ईमरान शेख, सलीम गवळी, संजय खडसे, शेखर तायडे, मुकेश साळवे, प्रकाश सपकाळे आदी उपस्थित होते.आभार जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी मानले.


कॉपी करू नका.