प्रेयसीसह कुटूंबातील जणांची हातोड्याने हत्या : आरोपीने आत्मसमर्पण करीत गुन्हा केला कबुल


वेंजरमुडू (25 फेब्रुवारी 2025) : मोठ्या प्रमाणावर कर्ज होवूनही कुटूंबाने मदत न केल्याच्या रागातून संतप्त तरुणाने आपल्या कुटूंबातील चौघांची व प्रेयसी मिळून पाच जणांची हातोडा मारून हत्या केली. ही घटना

केरळमधील तिरुअनंतपुरममधील वेंजरमुडू येथे सोमवारी संध्याकाळी घडली. या घटनेतील आरोपीने आईवर हल्ला केला आणि तिलाही मारण्याचा प्रयत्न केला व नंतर पोलिसांकडे आत्मसमर्पण केले.

पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले असून मृतांमध्ये आरोपीचा भाऊ अहसान, आजी सलमा बिवी, काका लतीफ, काकी शाहिदा आणि त्याची मैत्रीण फरशाना यांचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध दोन पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी सांगितले की, तरुणावर खूप कर्ज होते आणि त्याच्या कुटुंबाने त्याला ते परतफेड करण्यास नकार दिला होता. याच कारणामुळे तरुणाने ही घटना घडवली.

आरोपीने पोलिसांना सांगितले की, तो आखाती देशात व्यवसाय करत होता पण तिथे त्याचे मोठे नुकसान झाले. यामुळे त्याने खूप कर्ज घेतले होते. पण कुटुंबाने त्याला मदत केली नाही, म्हणून त्याने सर्वांना मारले. अफानचा मोबाईल फोन आणि कॉल डिटेल्स तपासले जात आहेत.

आरोपी अफानने त्याची आई शेमी (47) हिच्यावरही हल्ला केला. कर्करोगाची रुग्ण असून प्रकृती गंभीर असून त्यांना सध्या तिरुअनंतपुरम येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अफानलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !