भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात


भुसावळ (3 मार्च 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. व्यासपीठावर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक सुनील राणे, एस.पी.पाठक उपस्थित होते.

शिक्षक एस.पी.पाठक यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून विज्ञानाचे आजच्या मानवी जीवनातील महत्त्व सांगितले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी लॅपटॉप, पंखा, मोबाईल, चार्जर अशा विभिन्न वैज्ञानिक वस्तूंबद्दल अतिशय तपशीलवार माहिती विद्यार्थ्यांसमोर कथन केली. सुरेश कापसे यांनी विज्ञान दिनाची माहिती दिली. विज्ञान शिक्षक नितीन पाटील यांनी रमण इफेक्टबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.


सूक्ष्मदर्शकाचे वेगवेगळे प्रकार व त्यांच्या उपयोजन संदर्भात विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष सहभाग कार्यशाळा सुद्धा या निमित्ताने झाली. वाय.एन.झोपे यांनी मार्गदर्शन केले. नितीन पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. विज्ञान शिक्षक बी.बी.जोगी, वैशाली महाजन, स्वाती नेहेते, नेहा पाटील, सुनीता जावळे, मिलिंद बोंडे , विशाल राणे इत्यादी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !