धनंजय मुंडे यांना 302 मध्ये आरोपी करा : मनोज जरांगे-पाटील


Make Dhananjay Munde an accused under 302 : Manoj Jarange-Patil बीड (4 मार्च 2025) : धनंजय मुंडेंना आमदारकीसकट मंत्री पदावरुन उचलून फेकायला हवे व 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, असे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले की, संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे ही जबाबदारी आपली आहे. आपल्या हातात तेवढी एकच गोष्ट आहे की, येऊ द्या त्यांना सुटून जसे यायचे तसे येऊद्या संतोष देशमुख यांच्या हत्येचा बदला घेणंच आपल्या हातात आहे. हे खूप भयंकर कृत्य आहे. इतका राग का? चूक काही मोठी नव्हती. देशात कुठेच अशी हत्या झाली नाही. इतका रोष व्यक्त करण्याइतकं काहीच झाले नव्हते.


मनोज जरांगे म्हणाले की, या सर्व गोष्टीला धनंजय मुंडे जबाबदार आहे. त्याला यांचा पैसा गोड लागला. मग या लोकांनी जमीनी बळकावल्या लोकांना मारहाण केली. त्यांने मंत्रिपदाचा वापर यांच्यासाठी केले आहे. इतके तिरस्कारने भरलेले सरकार मी पाहिले नाही. पुरावे नाही म्हणता तुम्हाला लाज वाटेल. धनंजय मुंडे 302 मध्ये आरोपी झाला पाहिजे. तरच हे सरकार खानदानी सरकार आहे. यांना पैसा, पदे मिळवण्यासाठी हे कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. ही विकृती पहिल्यापासून अशीच आहे. मी खूप कठोर काळजाचा आहे, पण कालचे फोटो पाहिल्यानंतर कुणीही खचून जाईल. धनंजय देशमुख यांना घरात जावे लागेल, बाहेर यावे लागेल. याचा बिमोड आपल्याला करायचा आहे, तुम्हाला लढावे लागेल. हे आपल्या लेकरांवर हसले आता त्यांना बाहेर सुटून येऊ द्या मग जनतेला न्याय करावा लागेल.

मनोज जरांगे म्हणाले की, काल फोटो पाहिल्यानंतर मला रात्रभर झोप लागली नाही. मी तडफड करत होता. माझा संतोष देशमुख हसला पाहिजे, की माझ्या माघारी माझ्या मराठा पोरांनी बदला घेतला. आता बदला होणार, सर्व टोळीचा बिमोड करत बदला घेणार आहोत.

नियती आरोपींना माफ करणार नाही : धनंजय देशमुख
धनंजय देशमुख म्हणाले की, माझ्या भावाला किती वेदना झाल्या असतील, मला आता वेदना सहन होत नाहीत. फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक गावकर्‍यांच्या गळ्यात पडून रडावे असे वाटतंय. नियती आरोपींना माफ करणार नाही. फोटो पाहिल्यावर मला वेदना झाल्या. मला लहानपणींचे फोटो आठवले. भावाच्या हत्येचा एकच फोटो पाहून दुसरे फोटो पाहण्याची माझी हिमंत झाली नाही.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !