कृष्णा आंधळे जिवंत नाहीच ! : जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक दावा


Krishna Andhale is not alive! : Jitendra Awhad’s shocking claim मुंबई (4 मार्च 2025) : मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातील संशयीत कृष्णा आंधळे जिवंत नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महायुती सरकारवर टीका केली. सरकारकडे हे फोटो होते, तरीही धनंजय मुंडेंना लपवण्याचे काम सरकार करत होते, असे ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, नागपूरच्या अधिवेशनात या सगळ्या घटनेचं वर्णन मी केलं होतं. या फोटोतील सगळं वर्णन माझ्या भाषणात होतं. संतोष देशमुखांच्या अंगावर लघुशंका करण्यात आली, हे देखील मी विधानसभेत सांगितलं होतं. सरकारला प्रश्न विचारायचा की, 90 दिवसांपासून हे सगळे फोटो तुमच्या ताब्यात होते. माहिती सरकारला होती, मग सरकार इतकं निर्दयी आहे? इतकी सगळी माहिती असतानाही धनंजय मुंडेंना लपवण्याचे काम करत होते.


महाराष्ट्र पेटेल म्हटल्यावर धनंजय मुंडेंना जबरदस्ती राजीनामा द्यायला लावला. नाहीतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसता, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

आता महादेव मुंडेंची बायको उपोषणाला बसली आहे. तिला तरी न्याय द्या. रामकृष्ण बांगरांना न्याय द्या. किशोर फडच्या आई-वडिलांना बोलवून घ्या, त्याला न्याय द्या. बापू आंधळेच्या हत्या प्रकरणात न्याय द्या. मी अशा 15 हत्या प्रकरण संध्याकाळपर्यंत देतो आणि सरकारला आवाहन करतो की, तुम्ही हे गुन्हे दाखल करा आणि न्याय द्या. कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याची हत्या झालेली आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !