मुंडे-कराडाची एकत्र जमीन : अंजली दमानियांना दावा


Joint land of Munde-Karada : Anjali Damania claims मुंबई (5 मार्च 2005)  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांची एकत्र जमीन असल्याचा दावा केला आहे. जमिनीचा सातबाराच त्यांनी आपल्या सोशल मिडीयावर प्रसारित केला आहे.

हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे. कंपनी एकत्र, जमीन एकत्र जगमित्र शुगर्स चे 6 सातबारे मी डिजिटली डाउनलोड केले 3554 गुंठे जमीन (88 एकर 34 गुंठे) जमीन एकत्र असल्याचा दावा केला आहे. यामुळे आता धनंजय मुंडेंच्या जमिनीवर जप्ती येणार का ? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.


कराडकडे सहा लाखांचे महागडे मोबाईल
वाल्मीक कराड मोबाईलचा बडा शौकीन असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडील ती मोबाईलची किंमत ही सहा लाख रुपये आहे. यात आयफोनच्या लक्झरी सीरीजमधील 16 प्रो गोल्ड फोनसह एक गोल्डन रंगाचा आयफोन प्रो 13, तिसरा आयफोन 13 प्रो फिक्कट निळ्या रंगाचा असल्याचे समोर आले आहे.

वाल्मीक कराडने आपल्या मोबाईलमधील संपूर्ण डाटा डिलीट केला होता. पण एसआयटीच्या पथकाने हा डाटा तंत्रज्ञांची मदत घेऊन रिकव्हर केला आहे. यामुळे कराडच्या मालमत्तेचा तपशीलाबद्दल माहिती मिळाली आहे. यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

घुलेंचा अवादाच्या कर्मचार्‍यांना सल्ला
कराड आणि आवादा कंपनीकडून मागण्यात आलेली 2 कोटी रुपयांची खंडणीशी निगडीत व्हिडिओ पोलिसांना मिळाला आहे. आरोपपत्रात या व्हिडिओचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. या व्हिडिओ सुदर्शन घुले आवादा कंपनीच्या अधिकार्‍यांना सांगतोय की, 100 लोकं सांभाळण्याऐवजी एक कराड सांभाळा, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. अण्णांनी मागितलेले 2 कोटी रुपये देऊन टाका, तुमचे काम सुरु होईल. माझ्याविरोधात तुम्ही पोलिसांत तक्रार दिली ही गोष्ट वाल्मीक अण्णांना समजली आहे, ते तुमच्यावर संतापले आहेत. त्यामुळे वाल्मीक अण्णांची मागणी पूर्ण करा अन्यथा तुमची कामे बंद केली जातील, अशी धमकी सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या अधिकार्‍यांना दिल्याचे या व्हिडिओत दिसून येत असल्याचे समोर आले आहे.

पुण्यासह अनेक ठिकाणी मालमत्ता
वाल्मीक कराड याच्या राज्यात अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत. पुण्यातील मगरपट्टा सिटी आणि एफसी रोड भागात वाल्मीक कराडची जवळपास सव्वाशे कोटीची संपत्ती असल्याची माहिती आहे. तर बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्याची शेती आहे. जवळपास 4000 हजार कोटी रुपयांची संपत्तीचा तो मालक असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात येत आहे. याशिवाय, वाल्मीक कराड याच्याकडे अनेक महागड्या गाड्याही असल्याची माहिती समोर आली आहे. या गाड्या जप्त करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे. यामध्ये त्याच्याकडे फोर्ड इंडेव्हर, अशोक लेलँड (हायवा), जॅग्वार लैंड रोवर, जेसीबी, मर्सीडीझ बेन्झ, बीएमडब्लु, अशोक लंयलँड (हायवा), व्होल्वो अशा अनेक कार असल्याचे समोर आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !