अबू आझमींना जेलमध्ये टाकणार : मुख्यमंत्री फडणवीस


Abu Azmi will be put in jail: Chief Minister Fadnavis मुंबई (5 मार्च2025) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमींना 100 टक्के जेलमध्ये टाकणार असे म्हटले आहे. ते म्हणाले की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, शंभुराजे यांचा अपमान सहन करणार नाही. मविआच्या लोकांमध्ये पंडीत नेहरु यांचा निषेध करण्याची हिंमत आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. विधान परिषदेमध्ये गोंधळ झाल्याने सभागृह 10 मिनिटे तहकूब करण्यात आले.

विधान परिषदेमध्ये बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रशांत कोरटकरबद्दल संपूर्ण माहिती घेऊन बोलले पाहिजे. कोरटकर यांने कोल्हापूर कोर्टातून त्याला अटक करण्यासाठी स्थगिती घेतली आहे. कोरटकर हे चिल्लर लोकं आहेत. जितेंद्र आव्हाड काय बोलले यांचा तुम्ही कधी निषेध केला नाही.


देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांनी बोलताना म्हटले आहे की, औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते हे रेकॉर्डवर आहे. त्यांचा तुम्ही निषेध केला नाही. असे सिलेक्टीव्ह गोष्टी करू नका.

सपा आमदार अबू आझमी अधिवेशन संपेपर्यत निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी औरंगजेबाबद्दल केलेले वक्तव्य त्यांना भोवले आहे तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आझमींचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !