महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्यानंतर महायुतीतील ‘या’ मंत्र्यांच्या वाढल्या अडचणी
Cabinet Minister Jayakumar Gore मुंबई (5 मार्च 2025) : महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत सापडले आहेत. फडणवीस यांचे निकटवर्तीय असणारे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप झाला आहे. या महिलेने या प्रकरणी योग्य ती कारवाई झाली नाही तर 17 मार्चपासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेने यासंबंधी राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवून मंत्री जयकुमार गोरे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रात पीडितेने हे संपूर्ण प्रकरण विषद केले आहे.




सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत. 2016 मध्ये आमदार असताना जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असलेल्या महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक महिने स्वतःचे नग्न फोटो महिलेला व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. या त्रासाला कंटाळून महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी गोरेंनी प्रथम सातारा जिल्हा न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने त्यांचा अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर गोरे यांना अटक होऊन 10 दिवसांची जेलवारीही झाली होती.