गुलाबराव पाटील यांचा सवाल : कुणाचा खून करणार ? तेही सांगावे !
Gulabrao Patil’s question : Who will be killed ? Tell me that too ! जळगाव (8 मार्च 2025) : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे यांनी आम्हाला खून करण्याची परवानगी द्या, अशी मागणी करीत खळबळ उडवून दिली आहे. याबाबत त्यांनी एक पत्र सोशल मीडियावर प्रकाशित केले आहे. त्यानंतर या पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. या पत्राबाबत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोहिणी खडसे यांना कोणाचा खून करणार आहात ? असा सवाल केला आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोहिणी खडसे यांनी लिहलेल्या या पत्रावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहिणी खडसे कुणाचा खून करणार आहात ? हे त्यांनी सांगावे, अशी विचारणा त्यांनी केली आहे.

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या संदर्भात रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. एक खून माफ करावा, अशी विनंती केलेली आहे. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘रोहिणी खडसे काय म्हणाल्या याबाबत मला माहिती नाही मात्र त्या कोणाचा खून करत आहेत त्याच नाव सांगावं असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोहिणी खडसे यांना टोला लगावला आहे.
