कॅन्सर विरोधी रॅलीने चाळीसगाव शहर दणाणले

सिद्धी महिला मंडळ, इनरव्हील क्लबचे आयोजन : डॉ.उज्वला देवरे यांनी केले अभ्यासपूर्ण मार्गदर्शन


चाळीसगाव (8 मार्च2025) : जागतिक महिलादिनी शनिवारी सकाळी 6 वाजता ’आमचा एल्गार…गर्भपिशवीच्या कन्सरला हद्दपार करणार…आम्ही नारी कणखर…दूर ठेऊ कन्सर…’ अशा घोषणा देत डॉ. देवरे फाऊंडेशन संचलित सिद्धी महिला मंडळ व इनरव्हील क्लबच्या वतीने शाळकरी मुलींसह महिलांनी कन्सर विरोधी काढलेल्या जनजागृती रलीव्दारे संपूर्ण परिसर दणाणून सोडला. रलीला येथील पोलिस कवायत मैदानावरुन सुरुवात झाली.

सद्यस्थितीत कन्सर रोगाचे प्रस्थ वाढते आहे. यात महिलांना होणा-या कन्सरचे प्रमाणही मोठे आहे. याला रोखण्यासाठी लस उपलब्ध झाली असून याविषयी जनजागृती करण्यासाठीचं रलीचे आयोजन केले गेले. वीर सावरकर, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंधशाळा चौक, करगाव रोड यामार्गाने रलीची सांगता पोलिस कवायत मैदानावर झाली. रलीत दोनशेहून अधिक मुली तर शंभरहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, डॉ. जयवंत देवरे, डॉ. उज्वला देवरे, मिनाक्षी निकम, माजी नगराध्यक्षा पदमजा देशमुख, पत्रकार जिजाबराव वाघ, एम. बी. पाटील, प्राचार्य ब्रिजेश पाटील, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. सुनीता पवार, सचीव डॉ. नयना चव्हाण, सुनीता भोसले, कल्पना महाजन, डॉ. पल्लवी पाटील, साधना निकम, जुलेखा शुक्ल, सीमा शर्मा, अरुण पाटील, कुणाल पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल मालपुरे, सिरम इन्सिटीट्युटचे किरणकुमार पांडे, राजेश पवार, चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मंडळाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी
आदि उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सुनीता पवार यांनी तर सुत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले.


यशस्वितेसाठी सिद्धी महिला मंडळाच्या सरोज जाधव, सरला साळुंखे, इनरव्हील क्लबच्या विद्या चित्ते, संगीता येवले, सारिका राठोड, रोहिणी वाघ, क्रिडा शिक्षिका सिमा माळदकर, प्रविण राजपुत, वाहतूक पोलिस आदिंनी सहकार्य केले.

होय, कन्सर रोखणे शक्य आहे !
रलीच्या सांगता सोहळ्यात स्रीरोग तज्ञ व सिद्धी महिला मंडळाच्या प्रमुख डॉ. उज्वला देवरे कन्सर व महिलांना घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात डॉ. देवरे म्हणाल्या, महिलांना पाच प्रकारचा कन्सर होऊ शकतो. याविषयी 2019 मध्ये मी आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्रीरोगतज्ञ डॉक्टरांच्या परिषदेत अभ्यासपूर्ण संशोधन मांडले. याचं माध्यमातून जिल्ह्यातील 108 स्रीरोगतज्ञ डॉक्टरांना देखील प्रशिक्षित केले. कन्सरला कायमस्वरुपी दूर करण्यासाठी मुली व मुलांसाठी भारतातचं लस उपलब्ध झाली आहे. महिलांनी खबरदारी म्हणून तपासणी करणे अत्यावश्यक झाले आहे. लसीकरण आणि खबरदारी यामुळे कन्सरला रोखणे शक्य आहे. त्यासाठी आपण याविरुद्ध वज्रनिर्धार केला पाहिजे. असे आवाहनही त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात किरणकुमार कबाडी यांनी सायबर क्राईम हा देखील एक कन्सरचं आहे. चोरी, फसवणुकीचा हा आधुनिक प्रकार आहे. यासाठी खबरदारी, जनजागृती आणि काळजी हे उपाय आहे. सायबर क्राईमचा कन्सर रोखणे आपल्याचं हातात आहे. असेही ते म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !