भुसावळ रेल्वे स्थानकावर उद्यापासून 16 मार्चपर्यंत प्लेटफॉर्म तिकिट विक्री बंद
होळी सणाच्या पार्श्वभुमीवर गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे प्रशासनाचे पाऊल
भुसावळ (9 मार्च 2025) : आगामी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी सोमवार, 10 ते 16 मार्चदरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावर प्लेटफार्म तिकिटांवर तात्पुरत्या स्वरुपात बंदी लादण्यात आली आहे. यासोबतच विभागातील नाशिक व मनमाड या दोन्ही स्थानकांवरही ही बंदी राहणार आहे.
आगामी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी नियंत्रीत करण्यासाठी भुसावळ विभागातील काही प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात येत आहे. प्लेटफार्मवर यामुळे होणारी गर्दी कमी होईल तसेच स्थानक परिसरात प्रवाशांचा प्रवास सुरळीत होईल हा उद्देश आहे. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरील निर्बंध 10 ते 16 मार्च दरम्यान राहणार आहे. प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. या नियमांचे प्रवाशांनी पालन करुन याबाबत प्रवासाचे नियोजन करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.







