दशहतीसाठी कट्टा बाळगणार्या शिरपूरच्या तरुणाला धुळे गुन्हे शाखेकडून अटक
गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त : शस्त्र तस्करी ऐरणीवर
Dhule Crime Branch Arrests Youth from Shirpur for Possessing a ‘Katta’ (Country-made Pistol) धुळे (7 एप्रिल 2026) : दहशत निर्माण करण्यासाठी बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगणार्या शिरपूरातील तरुणाला धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी नगावबारी परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीच्या ताब्यातून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून त्याच्याविरोधात पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल साई किशन समोरील सर्व्हिस रोडवर एक संशयित तरुण दहशतीच्या उद्देशाने शस्त्र बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर सोमवार, 6 रोजी अटक करण्यात आली. राहुल पांडुरंग पाटील (29, रा.वरवाडे, ता. शिरपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून 40 हजार रुपये किंमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा व एक हजार रुपये किंमतीचा जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.










