भुसावळातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा
भुसावळ (10 मार्च 2025) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालय भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा नुकतीच झाली. उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ.अनिल डोंगरे यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून वाणिज्य विभागाचे सर्व बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.जान्हवी तळेगावकर, डॉ.शरद अग्रवाल व कार्यशाळेच्या समन्वयक व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.राजकुवर गजरे या होत्या. द्वितीय सत्रात द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गाच्या अभ्यासक्रमाच्या पुनर्रचना आराखड्यातील प्रत्येक विषयावर चर्चा करण्यात आली. उपस्थित प्राध्यापक व विविध अभ्यासमंडळाचे चेअरमन यांच्यातर्फे काही सूचना अभ्यासक्रमातील बदलाविषयी मांडण्यात आल्या व त्यावर अधिष्ठाता डॉ.अनिल डोंगरे यांनी अभ्यासक्रमात होणार्या बदलांविषयी येणार्या अडचणी समजून घेतल्या व त्यावर केल्या जाणार्या उपाया योजनांची सुद्धा माहिती प्राध्यापकांना दिली व त्यासोबत हे बदल करताना विद्यापीठाला येणार्या तांत्रिक अडचणी समजावून सांगितल्या. तिसर्या सत्रामध्ये समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शरद अग्रवाल अध्यक्षस्थानी होते.

प्रमुख पाहुणे म्हणून चाळीसगाव महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा.डॉ.मुकुंद बेलदार होते. कार्यशाळेच्या समन्वयक डॉ.राजकुवर गजरे यांनी अहवाल वाचन केले. प्रा.डॉ.रश्मी शर्मा, प्रा.डॉ.संदीप कोतकर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रा.पंकज फालक यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.माधुरी भुतडा यांनी तर समारोप समारंभाचे सूत्रसंचालन डॉ.राजकुवर गजरे यांनी केले. यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागाचे प्रा.सुरज हेडा,प्रा. प्रेरणा नेवे, प्रा.ललिता पाटील, प्रा.अश्विनी दातीर व सर्व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले.






