भुसावळात 22 व 23 मार्च रोजी ‘स्नेहयात्री करंडक’
दोन दिवसात सादर होणार तब्बल 14 मराठी नाटकं
भुसावळ (10 मार्च 2025) : शहरात स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे 22 आणि 23 मार्च रोजी दोन दिवसीय ‘स्नेहयात्री करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन रेल्वेच्या श्री कृष्णचंद्र सभागृहात करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून नाटक संघ सहभागी होणार आहेत. 14 एकांकिकेतून जवळपास 200 कलावंत व तंत्रज्ञ आपली कला सादर करतील. या स्पर्धेमुळे भुसावळकर रसिकांना दोन दिवस मोफत नाट्यमेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे.
14 नाटके होणार सादर
22 आणि 23 मार्च या दोन दिवसात राज्याच्या विविध शहरातून सहभाग नोंदवणारे 14 नाट्यसंघ एकूण 14 नाटक सादर करतील. दर्जेदार, आशयघन आणि संवेदनशील विषयांवरचे दमदार सादरीकरण हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. 14 एकांकिकेतून जवळपास 200 कलावंत व तंत्रज्ञ आपली कला सादर करतील. स्पर्धेतील विजेत्या संघांना सांघिक व वैयक्तीक अशा स्वरुपाची 56 हजार रुपयांची रोख बक्षीसे, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येतील. सर्व सहभागी कलावंत व तंत्रज्ञांना सहभाग प्रमाणपत्रे दिली जातील. स्पर्धेचे परीक्षक म्हणून नाट्यक्षेत्रातील प्रतिथयश कलावंत उपस्थित राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन आवाहन प्रकल्प प्रमुख नारायण माळी, स्नेहयात्री प्रतिष्ठानचे सचिव विश्वजीत घुले व अध्यक्ष विरेंद्र पाटील यांनी केले

असे आहेत कार्यक्रम
शनिवार, 22 मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता उद्घाटनन सोहळा होईल. तत्पूर्वी दुपारी 10 वाजेपासून संध्याकाळपर्यंत नाशिक, नगर, पुणे आणि जळगाव येथील एकूण सहा नाट्यसंघ आपल्या कलाकृती सादर करतील. रविवार, 23 मार्च रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सलग मुंबई, नाशिक, डोंबिवली, अंधेरी, सोलापूर, नाशिक येथील एकूण 7 नाट्यसंघ आपल्या एकांकिका सादर करतील. संध्याकाळी 7 वाजेला स्नेहयात्री प्रतिष्ठानच्या स्थानिक कलावंताचा स्नेहरंग हा नृत्य, गायन आणि मिमीक्री सादरीकरण. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा पारितोषिक वितरण होईल.
स्पर्धेसाठी आयोजन समिती जाहिर
स्पर्धेच्या आयोजन समितीत प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, रामचंद्र डहाके, राजेंद्र जावळे, प्रा.गिरीश कुलकर्णी, धनराज कुवर, अक्षय माधवपूरकर, आदर्श पंडा, राजेश पाटील, डॉ.गणेश भोळे, हरीश कोळी, खुशाल निंबाळे, प्रदीप चौधरी, तुषार जोशी, दिनेश ठाकरे यांचा समावेश आहे.
