भुसावळातील बिसारा लेडीज इक्वलिटी रनमध्ये 472 महिला धावल्या

भुसावळ (11 मार्च 2025) : जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशन आयोजित बिसारा लेडीज इक्वलिटी रनमध्ये तीन किमीच्या स्पर्धेत 281, पाच किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत 121 तर 10 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत 69 अशा एकूण 472 महिलांनी यशस्वी सहभाग नोंदविला. रविवारी शहरातील कोरोनेशन क्लबच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळेस स्पर्धकांना हिरवी झेंडी भुसावळ शहर वाहतूक विभागाचे सहा.निरीक्षक उमेश महाले यांनी दाखवली. माय फिटनेस जिमचे संचालक प्रमोद धनगर, डॉ.रती महाजन, सदिच्छादूत व प्रसिद्ध धावपटू कविता पाटील, डॉ नीलिमा नेहेते, डॉ चारूलता पाटील यांची उपस्थिती होती. अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ व सद्गुरु ज्येष्ठ नागरिक संघाया सदस्यांनीदेखील स्पर्धकांचे स्वागत केले. बक्षीस वितरणप्रसंगी व्यासपीठावर भेल इंडियाचे प्रतिनिधी अबीद, माय फिटनेसचे प्रमोद धनगर, धावपटू कविता पाटील, डॉ.रती महाजन, डॉ.नीलिमा नेहेते, डॉ.चारुलता पाटील, संजय कुकरेजा, अनंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
असे आहेत विजेते
पाच किलोमीटर- प्रथम- जानवी रोझोदे, द्वितीय- निकिता खोले, तृतीय- रिधिमा चौधरी, दहा किलोमीटर- प्रथम- तेजस्विनी ढाके, द्वितीय- वैशाली बडगुजर, तृतीय- ममता सपकाळे. स्पर्धा यशस्वीतेसाठी स्पर्धा संचालक म्हणून प्रवीण फालक यांनी काम पाहिले. संपूर्ण मार्गाचे व स्वयंसेवकांचे नियोजन ब्रिजेश लाहोटी व प्रवीण वारके यांनी पाहिले. मैदानाच्या तयारीचे नियोजन प्रविण पाटील व पंकज कुलकर्णी यांनी केले. वाहन तळाचे नियोजन छोटू गवळी यांनी पाहिले. राहुल पाटील यांच्या टायनी स्टुडिओ सोबत फोटोग्राफीचे नियोजन सुयश न्याती, अभिराम मेहंदळे, दीपेश सोनार यांनी केले. डॉ.जगदीश अत्तरदे, डॉ.सुयोग तन्निरवार यांनी वैद्यकीय विभाग सांभाळला तर डॉ.रिया अग्रवाल यांनी फिजीओथेरपीच्या टीमचे नियोजन केले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी तर किर्ती मोतळकर यांचे संपूर्ण प्रक्रियेत विशेष सहकार्य लाभले.


